- मुख्य घटक वगळा
- स्क्रीन रीडर ॲक्सेस
- बीटा आवृत्ती
क्राऊडफंडिंग गुंतवणूक फसवणूक
नवीन युगाचा सापळा: जेव्हा “स्टार्ट-अप” आणि “समाजसेवा” सपोर्ट ठरतो फसवणुकीस कारण
बनावट क्राउडफंडिंग गुंतवणूक प्लॅटफॉर्मचा वाढता धोकानवीन युगाचा सापळा: जेव्हा “स्टार्ट-अप” आणि “समाजसेवा” सपोर्ट ठरतो फसवणुकीस कारण
बनावट क्राउडफंडिंग गुंतवणूक प्लॅटफॉर्मचा वाढता धोका
भावनिक साद किंवा एखाद्या सुपीक कल्पनेतून याची सुरुवात होते.
नवीन युगातील स्टार्ट-अप दावा करतात“आम्ही भारताचे नेक्स्ट युनिकॉर्न”
सामाजिक उद्योग दावा करतात की,“जीवनात परिवर्तन, एकाचवेळी देणगीतून.”
आकर्षक क्राउडफंडिंग पेज दावा करतात की,लघू गुंतवणुकदारांसाठी इक्विटीआणि“फंडिंग बंद झाल्यानंतर 10x रिटर्न.”
सर्वकाही खरेखुरे भासते - लोगो, प्रशंसापत्रे, अगदी संस्थापकांचा फोटोही.
तुम्ही नवोपक्रम किंवा प्रभावशाली उपक्रमांना पाठिंबा दर्शविण्याच्या हेतूने छोट्या रकमेची गुंतवणूक करता.
काही आठवड्यांनंतर वेबसाईट अदृश्य होते. फोन नंबर संपर्क कक्षेच्या बाहेर जातात - आणि सोबत तुमची आशाही.
तुम्हाला बनावट क्राउडफंडिंग गुंतवणूक प्लॅटफॉर्मच्या जाळ्यात अलगद ओढण्यात आलेले असते.
गुंतवणूक फसवणूक म्हणजे काय?
क्राउड फंडिंगच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे उभे केले जातात - बिझनेस व्हेंचर्स, स्टार्ट-अप्स किंवा सामाजिक कारणांसाठी याचा वापर केला जातो. खरंतर उचित कारणांसाठी केले जाणारे क्राउडफंडिंग निश्चितच फायदेशीर ठरते. मात्र, घोटाळेबाज गैरफायदा घेऊन गुंतवणुकदार आणि देणगीदात्यांची फसवणूक करतात.
नेमके कसे काम करते जाणून घेऊया:
-
घोटाळेबाज खोटी वेबसाईट्स किंवा सोशल मीडिया पेज बनवितात. सामाजिक कामांसाठीचे स्टार्ट-अप करिता असल्याचा दावा केला जातो.
-
ते हाय इक्विटी रिटर्न, आयपीओ तत्काळ ॲक्सेस किंवा नफा-शेअरिंग चे वचन देतात.
-
हजारो लोकांकडून थोडे-थोडे पैसे गोळा करतात. व्यक्तिगत विचार करता आकडा छोटा भासतो. परंतु एकूण रक्कम निश्चितच मोठी ठरते.
-
योग्य प्रमाणात पैसे मिळाल्यानंतर थेट गायब होतात.
अनेकदा, हे घोटाळेबाज विश्वास संपादन करण्यासाठी भावनिकता आणि तातडीची गरज असल्याचे भासवतात - ज्यामध्ये समाजसेवेची भावनात्मक साद आणि स्टार्ट-अपचा उत्साह देखील समावेशित असतो.
धोक्याची घंटा
सायबर गुन्हे अहवालानुसार, सोशल मीडिया, टेलिग्राम ग्रूप, व्हॉट्सअप चॅनेल्सच्या माध्यमातून खोट्या क्राउडफंडिंग सोशल कॅम्पेनच्या विळख्यात सापडून हजारो भारतीयांनी पैसे गमावले आहेत .
कधी-कधी इक्विटी आधारित फसवणुकीला सामोरे जावे लागते. फसवणुकीच्या जाळ्यात नेहमी कोण अडकत असते? असे लघू रिटेल गुंतवणूकदार - जे ₹5,000 - ₹50,000 गुंतवणूक करताना विचार करतात की, " एखाद्या चांगल्या कल्पनेला मदत करण्यात काय नुकसान आहे?"
हे घोटाळे तुम्हाला कसे आकर्षित करतात
-
भावनिक साद: "आम्ही शाश्वततेसाठी प्रयत्नशील महिला-नेतृत्वातील स्टार्ट-अप आहोत."
-
वरकरणी प्रोफेशनल दिसणाऱ्या वेबसाईट्स आणि डॅशबोर्ड वर खोटी “गुंतवणूकदार माहिती.”
-
"ईएसजी", "इम्पॅक्ट इन्व्हेस्टिंग, "प्री-सीड राउंड", "एंजल पार्टिसिपेशन" इ. आकर्षक शब्दप्रयोग भुलविण्यासाठी करतात.
-
प्री-आयपीओ किंवा प्रारंभिक टप्प्यातील इक्विटीसाठी "एक्सक्लूसिव्ह ॲक्सेस" असा दावा करणारे मेसेजेस.
-
नोंदणीकृत व्यवसाय संस्थांऐवजी वैयक्तिक अकाउंट किंवा वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची विनंती.
क्राउडफंडिंग घोटाळ्यांपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे
-
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) संकेतस्थळावर कंपनीचे नोंदणी तपशील तपासा.
-
सामाजिक मदतीची वस्तुस्थिती जाणा पैसे उभारणी करण्यामागील खरे कारण जाणून घ्या. यामागे मनी लाँड्रिंगची देखील मोठी शक्यता नाकारता येत नाही.
-
स्मॉल-तिकीट "इक्विटी" आश्वासनांपासून सतर्क रहा - प्रमाणित इक्विटी गुंतवणूक नेहमीच परवानाधारक प्लॅटफॉर्म किंवा अधिकृत ब्रोकर्सद्वारे केली जाते.
-
गॅरंटीड रिटर्न देणारे कॅम्पेन टाळा - कोणतेही कायदेशीर स्टार्ट-अप्स हे करत नाहीत.
-
ना वैयक्तिक अकाउंट किंवा व्यक्तिगत यूपीआय आयडी, ज्यांद्वारे व्यवसायाचे प्रतिनिधी असल्याचा दावा केला जातो.
-
पारदर्शकता तपासा - प्रमाणित स्टार्ट-अप्स हे पडताळणी केलेले संपर्क तपशील, संस्थापकांचे लिंक्डइन प्रोफाईल्स आणि ताळेबंद कागदपत्रे सार्वजनिक करतात.
-
संशयास्पद प्लॅटफॉर्म बाबत सेबी किंवा cybercrime.gov.in कडे तक्रार नोंदवा.
महत्वाचा सल्ला: सहानुभूती योग्यच आहे. मात्र, सोबत खातरजमा हवीच.
नवोपक्रम आणि उद्योजकतेला सहाय्य करणे निश्चित मोलाचे आहे - परंतु यासाठी तुमची सुरक्षा पणाला लावू नका.
घोटाळेबाज वास्तव लपवतात. आमिषाची भूरळ घालतात. सौजन्यपूर्णता आणि समाजहिताच्या मुखवट्यामागे फसवणुकीचा चेहरा दडलेला असतो.
आत्मनिर्भर गुंतवणूकदार बना - कोणत्याही अपरिचित प्लॅटफॉर्मवरील "भव्य कल्पनेत" गुंतवणूक करण्यापूर्वी क्षणभर थांबा. विचार करा. पडताळा .
अस्सल स्टार्ट-अप्स विश्वासाचा पाया निर्माण करतात-फसवणुकीचे जाळे नव्हे.


