गोपनीयता धोरण

i. गोपनीयता विधान जेव्हा तुम्ही या साईटला भेट देता, जेव्हा तुम्ही एका पृष्ठावरुन दुसऱ्या पृष्ठावर जातात, पृष्ठे वाचतात, शोध घेतात, माहिती किंवा संप्रेषण सादर करतात किंवा तुमच्या संगणकावर सामग्री डाउनलोड करता, तेव्हा साईट खालील माहिती रेकॉर्ड आणि संकलित करू शकते:

तुम्ही कनेक्ट करीत असलेला आयपी अ‍ॅड्रेस.

कोणत्या पेजला भेट दिली जाते. साईटवर येण्यापूर्वी तुम्ही नुकत्याच भेट दिलेल्या वेबसाईट्सचा आयपी अ‍ॅड्रेस. लॉग-इन केलेल्या युजरसाठी आयपी अ‍ॅड्रेस आणि अकाउंट आयडी, यशस्वी आणि अयशस्वी प्रयत्नांची संख्या आणि पूर्ण झालेल्या उपक्रमांसाठी. एकल साईट भेट दरम्यान कार्यक्षमता सुलभ करण्यासाठी नॉन-परसिस्टंट कुकीजचा वापर केला जाऊ शकतो. कुकीजमध्ये वैयक्तिक माहिती नाही आणि भविष्यातील वापरासाठी कायमस्वरुपी संग्रहित केले जात नाही.

साईटला किती आणि कोणत्या प्रकारचे व्हिजिटर भेट देतात आणि साईटच्या कोणत्या विभागांना सर्वाधिक भेट दिली जाते हे जाणून घेण्यासाठी सीडीएसएल या माहितीचा वापर करू शकते. यामुळे सीडीएसएल ला कोणती माहिती सर्वात उपयुक्त आहे हे जाणून घेण्यास आणि विविध प्रकारच्या व्हिजिटर्सना आवश्यक असलेली माहिती ॲक्सेस करण्यासाठी साईटमध्ये संभाव्य सुधारणा ओळखण्यास मदत होते. सीडीएसएल, साईटच्या आणि/किंवा आयपी ॲड्रेसच्या व्हिजिटरच्या संख्येनुसार एकूण सांख्यिकीय माहिती रेकॉर्ड करू शकते. त्यांच्या कार्याचा एक भाग म्हणून, सीडीएसएल ला त्यांचे सहयोगी आणि/किंवा पुरवठादार आणि/किंवा इतर एजन्सी यांच्यासोबत "नीड टू नो" या आधारावर एकत्रित सांख्यिकीय माहिती किंवा इतर माहिती शेअर करणे आवश्यक असू शकते. साईटचा वापर करून, वापरकर्त्यांनी येथे नमूद केलेल्या हेतूंसाठी एकूण सांख्यिकीय माहितीचे संकलन आणि वापर करण्यास त्यांची परवानगी प्रदान केली आहे असे मानले जाते.

सीडीएसएल केवळ ओळखण्यायोग्य व्यक्तींबद्दल ची माहिती गोळा करते जी वापरकर्त्याने वापरकर्त्याचे नाव, पत्ता आणि या साइटच्या कोणत्याही ॲप्लिकेशन्समध्ये, ई-मेलमध्ये किंवा "आमच्याशी संपर्क साधा" भागांच्या वापराच्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रदान करण्यासाठी निवडलेल्या कोणत्याही अतिरिक्त तपशीलांची पूर्तता केल्यानंतर स्वेच्छेने प्रदान केली जाते. या साईटला भेट देण्यासाठी वापरकर्त्यांना सीडीएसएलची वैयक्तिक माहिती देण्याची आवश्यकता नाही. सीडीएसएलने या माहितीचे संरक्षण करण्यासाठी आणि ती पूर्ण विश्वासात ठेवण्याच्या प्रयत्नात सुरक्षा उपाय योजना लागू केल्या आहेत. तथापि, इंटरनेटवरील डाटा ट्रान्समिशन 100% सुरक्षित असण्याची हमी दिली जाऊ शकत नाही. सीडीएसएल कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही, वॉरंटी किंवा हमी देत नाही की अशा प्रकारे स्वेच्छेने दिलेली वैयक्तिक माहिती तोटा, गैरवापर किंवा बदल यापासून संरक्षित केली जाईल.

सीडीएसएल या साईटच्या इलेक्ट्रॉनिक सबमिशन्स, ॲप्लिकेशन्स, ई-मेल यांची सामग्री किंवा "आमच्याशी संपर्क साधा" या भागांचा इतर वापर राखून ठेवते, ज्यामध्ये ज्या ई-मेल पत्त्यावरून ट्रान्समिशन पाठवले गेले होते आणि त्यावर दिलेल्या प्रतिसादांचा समावेश आहे जेणेकरून कोणताही फॉलोअप हाताळता येईल.

या साईटचा वापर करून, वापरकर्त्याने येथे निर्धारित उद्देशांसाठी माहिती गोळा करण्यासाठी आणि वापरण्यासाठी वापरकर्त्याची परवानगी दिली असल्याचे मानले जाते.

साईटवर सुधारित गोपनीयता विधान पोस्ट करून कोणतीही पूर्वसूचना न देता कोणत्याही वेळी हे गोपनीयता विधान बदलण्याचा अधिकार सीडीएसएल कडे राखीव आहे.