- मुख्य घटक वगळा
- स्क्रीन रीडर ॲक्सेस
- बीटा आवृत्ती
डीपफेक घोटाळे: गुंतवणूक फसवणूकीचा नवीन चेहरा
या लेखाला भेट दिली आहे:
रिल्स, व्हिडिओ कॉल्स आणि वॉईस नोट्सच्या युगात, तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात ती खरी आहे की बनावट हे तुम्हाला कसे समजेल?
या लेखाला भेट दिली आहे:
रिल्स, व्हिडिओ कॉल्स आणि वॉईस नोट्सच्या युगात, तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात ती खरी आहे की बनावट हे तुम्हाला कसे समजेल?
आता कल्पना करा: तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओ मॅनेजरकडून व्हॉट्सॲप व्हिडिओ मेसेज प्राप्त होतो. तो ओळखीचा वाटतो, अगदी आठवणीतल्या आवाजासारखाच बोलतो, त्वरित 20% मासिक रिटर्नचे आश्वासन देणार्या नवीन इन्व्हेस्टमेंटची शिफारस करतो. तुम्ही त्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही कृती करता.
दुसऱ्या दिवशी, खरा मॅनेजर कॉल करतो - त्याला तुम्ही काय बोलत आहात हे काहीच कळत नाही.
तुमचं नुकतंच डीपफेक केलं गेलं आहे.
डीपफेक म्हणजे काय आणि इन्व्हेस्टरनी का काळजी घ्यावी?
डीपफेक ही एआय-निर्मित व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप असते ज्यात एखाद्या व्यक्तीचा चेहरा, हावभावांची आणि आवाजाची अगदी अचूकतेसह नक्कल केली जाते. मूळतः मनोरंजन आणि स्पेशल इफेक्ट्ससाठी विकसित, डीपफेक्सचा वापर आता फसवणूकदारांद्वारे इन्व्हेस्टर्सना फसवण्यासाठी आणि पैसे चोरी करण्यासाठी केला जात आहे.
2024 मध्ये, एका एमएनसी फर्मने डीपफेक स्कॅमची नोंद केली, ज्यात बहुराष्ट्रीय कंपनीला $25 दशलक्षपेक्षा जास्त नुकसान झाले, या स्कॅम मध्ये एका कर्मचाऱ्याने "सीनिअर एक्झिक्युटिव्ह" कडून बनावट व्हिडिओ कॉल प्राप्त झाल्यानंतर फंड ट्रान्सफर केला. https://edition.cnn.com/2024/02/04/asia/deepfake-cfo-scam-hong-kong-intl-hnk
भारतातही, असे धोके वाढत आहेत-सीईआरटी-इन (भारताची सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) ने त्यांच्या 2024 च्या सिक्युरिटी बुलेटिन मध्ये डीपफेक फसवणुकीला उदयोन्मुख जोखीम म्हणून नमूद केले आहे.
https://www.cert-in.org.in/s2cMainServlet?pageid=PUBVLNOTES02&VLCODE=CIAD-2024-0060
डीपफेक स्कॅम इन्व्हेस्टरना कसे टार्गेट करतात
घोटाळेबाज बनावट व्यक्तिमत्व तयार करतात — आर्थिक सल्लागार, प्रभावक, अगदी नियामक सुद्धा — ज्यामुळे पीडित व्यक्तींना कृती करण्यास भाग पाडले जाते. ते सामान्यपणे कसे काम करतात हे येथे दिले आहे:
-
सार्वजनिक कंटेंट स्क्रॅप करा: व्हिडिओ, मुलाखती, ज्ञात आकडेवारीचे सोशल मीडिया क्लिप्स.
-
चेहरा/आवाज क्लोन करणे: मोफत किंवा निम्न खर्चाच्या एआय टूल्स वापरून.
-
मेसेजेस पाठवणे/कॉल्स करणे: एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या रूपात पिडीत व्यक्तीला पुढील गोष्टींकरिता आग्रह करणे:
-
स्कीम किंवा आयपीओ मध्ये त्वरित इन्व्हेस्ट करा
-
ओटीपी, बँक तपशील किंवा केवायसी डॉक्युमेंट्स शेअर करा
-
अस्सल प्लॅटफॉर्मची नक्कल करणाऱ्या दुर्भावनापूर्ण लिंकवर क्लिक करणे
-
हे सर्व विश्वसनीय वाटते — पण कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो.
वास्तविक-जगातील प्रसंग ज्याकरिता तुम्ही सतर्क राहावे
-
संदिग्ध गुंतवणूक ॲपचा प्रचार करणाऱ्या आदरणीय आर्थिक प्रभावकाचा डीपफेक व्हिडिओ
-
तुमची एसआयपी अपडेट करण्यासाठी ओटीपी मागणारी "तुमच्या सल्लागाराकडून" वॉईस नोट
-
तुम्हाला अनुपालन समस्यांबद्दल चेतावणी देणारा आणि त्वरित कारवाईची मागणी करणारा सेबी किंवा आरबीआय अधिकाऱ्याची तोतयागिरी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ कॉल
प्रशिक्षित व्यावसायिकही अशा युक्त्यांना बळी पडले आहेत. तुम्हाला सुरक्षित ठेवणारी गोष्ट म्हणजे अनुभव नव्हे, तर जागरूकता.
स्मार्ट इन्व्हेस्टरची चेकलिस्ट: एक पाऊल पुढे राहा
या सोप्या 7-पॉईंट ॲक्शन प्लॅनसह स्वत:चे संरक्षण करा:
-
दुसऱ्या चॅनेलद्वारे विनंत्यांची पडताळणी करा. जर कोणी पैसे किंवा वैयक्तिक माहितीची मागणी करत असेल तर त्यांना त्यांच्या ग्राहक सपोर्ट नंबरवर कॉल करा.
-
कधीही ओटीपी, पासवर्ड किंवा सीव्हीव्ही शेअर करू नका, विनंती एखाद्या परिचिताकडून येत असली तरीही.
-
व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा ईमेलद्वारे पाठविलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा. नेहमीच अधिकृत ॲप किंवा वेबसाईटला थेट भेट द्या.
-
गुंतवणूक करण्यापूर्वी सल्लागार सेबी नोंदणीकृत आहे की नाही हे तपासा..
-
अवास्तव परताव्याची खातरजमा करा. "20% हमीपूर्ण" ही संधी नाही- एक सापळा आहे.
-
तुमचे डिजिटल फूटप्रिंट किमान ठेवा- तुमचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक अपलोड करण्याची मर्यादा ठेवा ज्याचा तुमची ओळख क्लोन करण्यासाठी गैरवापर केला जाऊ शकतो.
-
संशयास्पद मेसेजेस रिपोर्ट करा cybercrime.gov.in किंवा तुमच्या स्थानिक सायबर पोलिसांना.
निष्कर्षात: काळजीपूर्वक विश्वास ठेवा. पूर्णपणे पडताळा.
तंत्रज्ञानाने गुंतवणुकीला स्मार्ट बनवले आहे-परंतु त्यामुळे स्कॅम्स अधिक तीव्र झाले आहेत. डीपफेक्स आता आपले डोळे आणि कान दोघांनाही फसवू शकते. परंतु थोडी सावधगिरी बाळगली, तर आपण पुढे राहू शकतो.
त्यामुळे तुम्ही जे पाहता किंवा ऐकता त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी, लक्षात ठेवा:
थांबा. विचार करा. पडताळा करा.
कारण तुमची आर्थिक सुरक्षितता आंधळ्या विश्वासापेक्षा जास्त महत्त्वाची आहे.
आत्मनिर्भर इन्व्हेस्टर व्हा-माहिती ठेवा, सुरक्षित राहा.
