- मुख्य घटक वगळा
- स्क्रीन रीडर ॲक्सेस
- बीटा आवृत्ती
गुंतवणुकीची पहिलीच वेळ - वाचा काय करावे आणि करू नये
सिक्युरिटीज मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हा काळानुसार संपत्तीमध्ये वाढ करण्याचा मार्ग असू शकतो.. परंतु, मार्केट मध्ये नवखे असणाऱ्यांना सुरुवातीला कठीण आणि किचकट वाटू शकते. जबाबदारपणे गुंतवणूक करण्यासाठी काही बाबींचं मूलभूत ज्ञान तुमच्याकडं निश्चितच हवं. नवशिक्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी काही महत्त्वाचे काय करावे आणि काय करू नये.
नवगतांसाठी काय करावे
मार्केटविषयी स्वत:चं ज्ञान वाढवा
प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यापूर्वी, सिक्युरिटी मार्केटच्या मुलभूत बाबी, विभिन्न गुंतवणूक साधनं आणि त्यांची कार्यप्रणाली याविषयी जाणून घ्या. स्टॉक, बाँड, म्युच्युअल फंड्स आणि मार्केट जोखीम विषयीचं ज्ञान, निश्चितच बनवेल तुम्हाला परिपूर्ण
छोटी सुरुवात करा
सुरुवात म्हणून, लहान गुंतवणूक करणं योग्य ठरेल. या दृष्टीकोनामुळे भांडवल जोखीम न घेता मार्केटचा कारभार समजून घेणं शक्य ठरेल. जसा तुमचा आत्मविश्वास आणि अनुभव वाढेल, तशी हळूहळू गुंतवणूक वाढवा.
तुमचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण करा
विभिन्न ॲसेट क्लास, सेक्टर आणि कंपन्यांमध्ये तुमची गुंतवणूक विभाजित करुन वैविध्यपूर्णता तुमची जोखीम कमी करते. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ मुळं नफा आणि तोट्याचं संतुलन साधणं शक्य ठरतं.
गुंतवणुकीची नियमित देखरेख करणे
तुमच्या गुंतवणुकीचा नियमित आढावा घेणं आणि मार्केट ट्रेंड्स सोबत अपडेटेड राहणं महत्वपूर्ण आहे. नियमित देखरेख तुमच्या धोरणात बदल करण्याची आणि आवश्यकता वाटल्यास माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते.
नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन
तुमची गुंतवणूक सेबी-नोंदणीकृत मध्यस्थामार्फत असल्याची खात्री करा आणि सर्व नियामक तत्वांचे पालन करा. ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे संरक्षण होईल आणि तुम्ही फसवणुकीला बळी पडणार नाही.
नवगतांसाठी काय करू नये
मार्केट ट्रेंडचे अंधानुकरण टाळा
केवळ अफवा, टिप्स आणि ट्रेंड वर तुमचे गुंतवणूक निर्णय घेणं टाळा. अशी माहिती विश्वसनीय नसू शकते आणि त्यामुळे चुकीचा आर्थिक निर्णय घेतला जाऊ शकतो.
कर्जाचे पैसे गुंतविणे
उसनवारी किंवा कर्जाचे पैसे सिक्युरिटी मार्केट मध्ये गुंतवणूक करणं धोक्याचं आहे. मार्केट मधील चढ-उतारांमुळे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
त्वरित रिटर्नची अपेक्षा करणं
सिक्युरिटीज मार्केट हे तत्काळ लाभ मिळविण्याचं ठिकाण नाही. अवास्तविक अपेक्षा यामुळे घाईगडबडीत निर्णय आणि अनावश्यक नुकसान होऊ शकते. संयम आणि दीर्घकालीन नियोजन महत्त्वाचे आहेत.
संशोधनाकडे दुर्लक्ष
तुम्ही गुंतवणूक करत असलेली कंपनी, सेक्टर किंवा म्युच्युअल फंड यांचे संशोधन नेहमी करा. संशोधनाकडे दुर्लक्ष केल्यास दुय्यम कामगिरी असलेले किंवा अविश्वसनीय ऑप्शन्स निवडीची जोखीम अधिक वाढते.
मार्केट चढ-उतार दरम्यान गोंधळणं
मार्केट अस्थिरता अपेक्षित असते. अल्प कालीन मार्केट हालचालीवेळी भावनांवर नियंत्रण असू द्या. त्याऐवजी, दीर्घकालीन लक्ष्य आणि तुमच्या गुंतवणूक धोरणावर लक्ष्य केंद्रित करा.
#BanoAtmanirbharInvestor
