विशेष ऑफर किंवा विस्तृत स्कॅम?

बनावट एसएमई (लघु आणि मध्यम उद्योग) आयपीओ आणि प्री-आयपीओ शेअर स्कॅमचा वाढता धोका

हे आकर्षक पिचसह सुरू होते:

बनावट एसएमई (लघु आणि मध्यम उद्योग) आयपीओ आणि प्री-आयपीओ शेअर स्कॅमचा वाढता धोका

हे आकर्षक पिचसह सुरू होते:

"सर, आम्ही तुम्हाला विशेष सवलतीमध्ये प्री-आयपीओ शेअर्सचा लवकर ॲक्सेस देऊ शकतो. एकदा कंपनी लिस्ट झाल्यानंतर, तुमचे पैसै सहजपणे दुप्पट होतील. ही एक अंतर्गत डील आहे - चुकवू नका!"

फसवणूक करणारा व्यक्ती प्रायमरी मार्केट सोबत संबंधित असलेला ब्रोकर, मध्यस्थ किंवा इनसायडर (अंतर्गत व्यक्ती) असल्याची बतावणी करतो. वेगाने विस्तारणाऱ्या एसएमई आयपीओ किंवा प्री-आयपीओ प्लेसमेंटमध्ये शेअर्स देण्याचे कबूल करतात. जे सहसा टाळणं शक्य नसते.

तुम्ही पैसे ट्रान्सफर करता.
"वाटप" कधीच येत नाही.
आणि फसवणूक करणारे तसेच करतात - नंतर संपर्काच्या बाहेर जातात.

बनावट एसएमई आयपीओ आणि प्री-आयपीओ शेअर स्कॅम म्हणजे काय?

अशा प्रकारची फसवणूक इनिशिअल पब्लिक ऑफरिंग्ज (आयपीओ) आणि लघु आणि मध्यम उद्योग (एसएमई) लिस्टिंग मधील गुंतवणूकदारांच्या हिताला बाधा निर्माण करते. ज्यामध्ये अनेकवेळा जलद लिस्टिंग करुन अधिकच्या नफ्याच्या अफवा निर्माण केल्या जातात.

फसवणूकदार:

  • ब्रोकर्स, मर्चंट बँकर्स किंवा इन-सायडर्स म्हणून बतावणी करतात

  • सवलतीच्या दरात प्री-आयपीओ किंवा एसएमई शेअर्सचे "विशेष वाटप" ऑफर करतात

  • खरेखुरे दिसण्यासाठी बनावट कागदपत्रे, वाटप पत्रे किंवा पावत्या सामायिक करतात

  • नियमित चॅनेल्स ऐवजी वैयक्तिक अकाउंटमध्ये पैसे कलेक्ट करा

एकदा त्यांनी एकाधिक गुंतवणुकदारांकडून पैसे गोळा केल्यानंतर, ते गायब होतात - पीडितांच्या हाती ना शेअर्स असतात, ना परतावा.

गुंतवणूकदार फसवणुकीच्या जाळ्यात कसे अडकतात?

  • तत्काळ लाभाचा लोभ: प्री-आयपीओ आणि एसएमई आयपीओ बहुतेकदा उच्च लिस्टिंग परताव्याशी संबंधित असतात.

  • गमावण्याची भीती (FOMO): फसवणूक तातडीचे सूत्र वापरतात — “मर्यादित वाटप, घाई करा”.

  • भूरळ घालणारे शब्द: "अँकर इन्व्हेस्टर्स", "एक्सक्लुझिव्ह ट्रांच" किंवा "मित्र आणि कुटुंब वाटप" सारख्या संज्ञा वापरुन सर्वकाही कायदेशीर असल्याचा भास निर्माण केला जातो.

  • पडताळणीचा अभाव: मध्यस्थ सेबी-नोंदणीकृत आहे का हे अनेक गुंतवणूकदार तपासत नाहीत.

वास्तविक प्रकरणे

स्वत:चे संरक्षण कसे करावे

  1. लक्षात ठेवा: "बॅकडोअर वाटप" कधीही नसते. आयपीओ आणि एसएमई इश्यूज सेबीच्या कठोर प्रक्रियेचे पालन करतात. शेअर्सचे वाटप पारदर्शकपणे केले जाते.

  2. तथाकथित ब्रोकर्स किंवा आंतरिकांच्या वैयक्तिक अकाउंटमध्ये फंड ट्रान्सफर करू नका. तुमच्या डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटशी लिंक असलेले केवळ अधिकृत बँकिंग चॅनेल्स वापरा.

  3. कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी मध्यस्थ सेबी-नोंदणीकृत आहे का ते तपासा.

  4. बनावट वाटप पत्रांपासून सावध राहा. सर्व प्रमाणित वाटप हे थेट तुमच्या डिमॅट खात्यात जमा केले जातात. कधीही ईमेल किंवा पीडीएफद्वारे नाही.

  5. हमीयुक्त परताव्याला बळी पडू नका. आयपीओ, विशेषतः एसएमई आयपीओ, इतर कोणत्याही इक्विटी गुंतवणुकीप्रमाणेच जोखीम बाळगतात.

  6. संशयास्पद कृतींची सेबी, स्टॉक एक्सचेंज किंवा cybercrime.gov.in कडे तक्रार नोंदवा.

शेवटचं पण महत्वाचं: जर ते खूप खास असेल तर तो कदाचित एक घोटाळा असू शकेल

फसवणूक करणारे लोक अवास्तव गोष्टी आणि शॉर्टकटचा आधार घेतात. ते तुम्हाला "आयपीओ साठी विशेष सोय, सवलत" असल्याचे सांगून आश्वस्त करतात. परंतु प्रत्यक्षात, कोणतेही गोपनीय वाटप किंवा अंतर्गत सवलती नसतात.

म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला अधिकृत चॅनेलच्या बाहेर प्री-आयपीओ किंवा एसएमई आयपीओ शेअर्स ऑफर करेल तेव्हा लक्षात ठेवा कीक्षणभर थांबा, विचार करा आणि मगच खात्री करा.
आत्मनिर्भर गुंतवणूकदार बना!

कारण गुंतवणूक करताना, विश्वास प्राप्त एकमेव "एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस" म्हणजे तुमच्या स्वतःच्या डिमॅट खात्यात नियमन केलेला आणि रेकॉर्ड केलेला ॲक्सेस.