- मुख्य घटक वगळा
- स्क्रीन रीडर ॲक्सेस
- बीटा आवृत्ती
दिसायला ॲपसारखं. पण वागायला ट्रॅपसारखं.
बनावट गुंतवणूक ॲप्स इन्व्हेस्टर्सना कसे फसवत आहेत - आणि तुम्ही कसे सुरक्षित राहू शकता
आकर्षक आणि व्यावसायिक दिसणारे ॲप डाउनलोड करण्याची कल्पना करा. हे वाढते चार्ट, रिअल-टाइम डाटा आणि तुम्हाला गाईड करणारा चॅटबॉट "सल्लागार" देखील दर्शविते. हे सुरक्षित गुंतवणूक, जलद रिडेम्पशन आणि "गॅरंटीड" परताव्याचे वचन देते.
बनावट गुंतवणूक ॲप्स इन्व्हेस्टर्सना कसे फसवत आहेत - आणि तुम्ही कसे सुरक्षित राहू शकता
आकर्षक आणि व्यावसायिक दिसणारे ॲप डाउनलोड करण्याची कल्पना करा. हे वाढते चार्ट, रिअल-टाइम डाटा आणि तुम्हाला गाईड करणारा चॅटबॉट "सल्लागार" देखील दर्शविते. हे सुरक्षित गुंतवणूक, जलद रिडेम्पशन आणि "गॅरंटीड" परताव्याचे वचन देते.
तुम्ही गुंतवणूक करता.
त्यानंतर एक दिवस, ॲप क्रॅश होते. ग्राहक सेवा नंबर काम करत नाही. तुमचे पैसे गेले आणि अशी कोणतीही प्लॅटफॉर्म कधी अस्तित्वातच नव्हती.
तुमची नुकतीच बनावट गुंतवणूक ॲप द्वारे फसवणूक करण्यात आली आहे.
बनावट गुंतवणूक अॅप्स काय आहेत?
बनावट गुंतवणूक ॲप्स हे म्युच्युअल फंड गुंतवणूक, ट्रेडिंग किंवा वेल्थ निर्मितीसाठी कायदेशीर प्लॅटफॉर्म्सची नक्कल करण्यासाठी डिझाईन केलेले फसवणूकीचे मोबाईल ॲप्लिकेशन्स असतात. काही ज्ञात कंपन्यांच्या ब्रँडिंगची नक्कल करतात; तर इतर कोणत्याही पाठिंबा किंवा नोंदणीशिवाय पूर्णपणे बनावट असतात.
त्यांचे ध्येय एकच असते: निष्पाप इन्व्हेस्टरकडून पैसे आणि वैयक्तिक डाटा काढणे.
भारतात, जवळपास 7,000 सायबर फसवणूक दररोज नोंदविल्या जातात. केवळ 2024 मध्ये, 1 लाखांहून अधिक प्रकरणांमध्ये बनावट गुंतवणूक प्लॅटफॉर्म्सचा समावेश होता. या प्लॅटफॉर्म्सनी उच्च परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे गोळा केले आणि नंतर गायब झाले, ज्यामुळे ₹3,216 कोटींचे नुकसान झाले. याव्यतिरिक्त, 20,043 प्रकरणे क्लोन ट्रेडिंग ॲप्सशी संबंधित होती, जिथे पीडितांना बोगस फॉरेक्स किंवा ऑप्शन्स ट्रेडमध्ये फसवले गेले होते, अनेकदा क्रिप्टोकरन्सी मध्ये रुपांतरित केलेल्या फंडसह-परिणामी ₹1,420 कोटींचे नुकसान झाले.
स्त्रोत
अलीकडेच जुलै 2025 पर्यंत, तेलंगणा सायबर सिक्युरिटी ब्युरोने बनावट गुंतवणूक ॲप स्कॅममध्ये सहभागी असलेल्या तीन व्यक्तींना हैदराबादमध्ये अटक केली. त्यांनी निष्पाप इन्व्हेस्टर्सकडून जवळपास ₹3.24 कोटी लुबाडले होते.
न्यूज रिपोर्ट
ते तुम्हाला कसे ट्रॅप करतात?
-
सोशल मीडियावर पेड ॲड्स: "एक्सक्लूसिव्ह" किंवा "उच्च-परतावा" गुंतवणूकीचा प्रचार करणे.
-
तोतयागिरी: सेबी-नोंदणीकृत मध्यस्थांसारखीच नावे/लोगो वापरणे.
-
बनावट डॅशबोर्ड: विश्वास निर्माण करण्यासाठी अवास्तविक परतावा आणि बनावट एनएव्ही दाखवणे.
-
रेफरल स्कॅम: मित्रांना आमंत्रित करण्यासाठी कमिशन किंवा रिवॉर्ड ऑफर करणे.
-
कोणतेही वास्तविक अनुपालन नाही: केवायसी नाही, सेबी नोंदणी नाही, संरक्षण नाही.
काही लोक प्रामाणिक वाटण्यासाठी तथाकथित आर्थिक तज्ञासह "सपोर्ट नंबर" किंवा बनावट व्हिडिओ चॅट देखील ऑफर करतात.
बनावट गुंतवणूक अॅप्सपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे
-
केवळ अधिकृत स्टोअरमधून ॲप्स डाउनलोड करा जसे की गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर-कधीही रँडम लिंक किंवा फॉरवर्ड केलेल्या मेसेजेस मधून नाही.
-
प्लॅटफॉर्म किंवा मध्यस्थ सेबी-नोंदणीकृत आहे का ते पडताळा त्याकरिता ही अधिकृत लिंक वापरा: 👉 सेबी | मान्यताप्राप्त मध्यस्थ
-
कंपनीची वेबसाईट तपासा आणि ॲपचे नाव आणि संपर्क तपशील जुळत असल्याची खात्री करा.
-
गॅरंटीड रिटर्नचे वचन देणारे ॲप्स टाळा-कायदेशीर गुंतवणूक कधीही निश्चितता ऑफर करत नाही.
-
केवायसी शिवाय इन्व्हेस्ट करू नका. सेबी-नोंदणीकृत प्लॅटफॉर्म योग्य केवायसी प्रोटोकॉलचे अनुसरण करतात.
-
तत्काळ निर्णय घ्या असा आग्रह करणाऱ्या ॲप्सपासून सावध राहा, ज्या उच्च रेफरल कमिशन्स ऑफर करतात किंवा "खूपच चांगला" वाटणारा परतावा दाखवतात
-
अतिरिक्त सुरक्षेसाठी 2FA (टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन) सक्षम करा आणि नियमितपणे तुमच्या बँक अकाउंटवर देखरेख करा.
शेवटचं पण महत्वाचं: दिसणं महत्त्वाचं नाही – विश्वासार्हता सर्वात महत्त्वाची
फसवणूकीचे ॲप्स अत्याधुनिक दिसू शकतात, परंतु ते तुमचे पैसे, तुमचा डाटा आणि तुमची मनःशांती चोरी करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत.
त्यामुळे तुम्ही तुमच्या मेहनतीच्या पैशाने ॲपवर विश्वास ठेवण्यापूर्वी:
थांबवा. तपासा. पडताळा करा.
आत्मनिर्भर इन्व्हेस्टर बना, केवळ डाउनलोड करू नका-सखोल तपासणी करा.


