इन्फोग्राफिक्स

Different Types Of Securities Educational Graphic

जाणून घेऊया- मार्केट मधील विविध सिक्युरिटीजचे प्रकार

गुंतवणूक विश्वासात, स्मार्ट गुंतवणूक निर्णय घेताना मार्केट मधील विविध प्रकारच्या सिक्युरिटीज समजावून घेणं देखील तितकेच महत्वाचे ठरते.. भारतीय मार्केट मध्ये वैशिष्ट्यपूर्ण विभिन्न मार्केट सिक्युरिटीज उपलब्ध आहेत. चला सर्वात सामान्य प्रकारच्या सिक्युरिटीज आणि त्यांचे महत्त्व पाहूया.

इक्विटी शेअर्स (स्टॉक)

ते कंपनीमध्ये मालकीचे प्रतिनिधित्व करतात. शेअरधारकांना मतदान अधिकार, लाभांश आणि संभाव्य स्टॉक मूल्य वाढ मिळते.

बाँड्स (डेब्ट सिक्युरिटीज)

इन्व्हेस्टर्स हे कंपनी किंवा सरकार यांना कर्ज स्वरुपात पैसे देतात. नियतकालिक व्याज आणि प्रिन्सिपल रिपेमेंटची अर्निंग करतात. स्टॉकपेक्षा कमी जोखीम, स्थिर उत्पन्नासाठी आदर्श.

प्राधान्य शेअर्स

इक्विटी आणि डेब्टचे हायब्रिड. इक्विटी शेअरधारकांपेक्षा लाभांश आणि ॲसेट्समध्ये प्राधान्य देते. परंतु मतदान हक्कांचा अभाव. मर्यादित भांडवली वाढीसह स्थिर उत्पन्न प्रदान करते.

डेरिव्हेटिव्ह

स्टॉक किंवा कमोडिटीज सारख्या अॅसेट पासून मूल्य मिळवणारे करार. हेजिंग किंवा अंदाजासाठी वापर. अनुभवी इन्व्हेस्टरसाठी सर्वोत्तम.

म्युच्युअल फंड

वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ निर्मितीसाठी इन्व्हेस्टरचे पैसे एकत्रित करणे. व्यावसायिकांद्वारे व्यवस्थापित, कमी वैयक्तिक जोखीम आणि इक्विटी, डेब्ट आणि हायब्रिड फंड सारख्या विविध प्रकारांची ऑफर.

एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ)

अगदी म्युच्युअल फंड्स प्रमाणेच परंतु स्टॉक प्रमाणे ट्रेडिंग. इंडायसेस, सेक्टर किंवा कमोडिटी ट्रॅक करते. रोखसुलभता, विविधता आणि किफायतशीरपणा उपलब्ध करते.

सरकारी सिक्युरिटीज (जी-सेक)

सरकारद्वारे जारी केलेली डेब्ट इन्स्ट्रमेंट्स. कमी परतावा देणारे अत्यंत सुरक्षित, पारंपरिक इन्व्हेस्टर्स साठी सुयोग्य.

भारतीय मार्केट विविध आर्थिक लक्ष्य आणि जोखीम क्षमतेशी संरेखित विविध सिक्युरिटीज ऑफर करतात. तुमची उद्दिष्टे आणि जोखीम आधारित सुज्ञपणे निवडा.

#BanoAtmanirbharInvestor